परिस्थितीकीय मनोरे किती प्रकारचे असतात?www.marathihelp.com

पारिस्थितिकीय स्तूप तीन प्रकारचे असतात : (अ) ऊर्जा स्तूप; (आ) संख्या स्तूप; (इ) जैववस्तुमान स्तूप.

(१) समष्टी : नानज अभयारण्यातील सर्व माळढोक पक्षी मिळून त्यांची समष्टी बनते, तसेच एखाद्या वनात असलेले सर्व साग वृक्ष त्यांची समष्टी दाखवितात. पारिस्थितिकी तज्ज्ञ समष्टीत झालेली वाढ निश्चित करतात, तिचे विश्लेषण करतात आणि प्रत्येक जाती व पर्यावरणाची स्थिती यांतील आंतरसंबंध शोधतात.

कोणत्याही समष्टीतील सजीवांची संख्या दोन पायाभूत बलांतील आंतरक्रियांवर अवलंबून असते – (१) आदर्श परिस्थितीत समष्टी वाढू शकेल असा दर आणि (२) समष्टीवर मर्यादा आणणाऱ्या पर्यावरणीय घटकांचा एकत्रित परिणाम. या घटकांमध्ये अन्नतुटवडा, भक्षकांचे हल्ले, स्वजातीय किंवा परजातीय सजीवांशी स्पर्धा, हवामान आणि रोग इ. बाबींचा समावेश होतो.

बदलणाऱ्या काळानुसार समष्टीमध्ये लक्षणीय बदल होऊ शकतात. काही वेळा हे बदल नैसर्गिक घटनांमुळे घडतात. उदा., पर्जन्यमानात झालेल्या बदलामुळे काही समष्टी वाढतात, तर काही घटतात. एखाद्या नवीन रोगामुळे वनस्पतींची किंवा प्राण्यांची समष्टी लहान होते. काही वेळा मानवी कृतींमुळेही असे बदल घडतात. उदा., औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र व वाहने यांच्याद्वारे आम्लयुक्त वायू हवेत सोडले जातात, ते ढगात मिसळतात आणि आम्लयुक्त पावसाच्या रूपाने पृथ्वीवर पडतात. ज्या क्षेत्रात आम्लयुक्त पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो, तेथील माशांच्या समष्टीत मोठी घट होते.

पर्यावरणाची वहनक्षमता : कोणत्याही विशिष्ट जातीच्या कमाल समष्टीला अन्न, पाणी, अधिवास इ. बाबी पुरवू शकणाऱ्या पर्यावरणाच्या क्षमतेला ‘पर्यावरणाची वहनक्षमता’ म्हणतात. वाईट हवामान, भक्षकांद्वारे होणारी शिकार, विणीचा वाईट हंगाम इ. बाबींमुळे पर्यावरणाच्या वहनक्षमतेपेक्षा समष्टी नेहमीच लहान असते.

(२) समुदाय : ताडोबाच्या समुदायात वाघ, कोल्हे, लांडगे,‍ हरिणे, उंदरे, वेगवेगळ्या जातीची गवते, साग, साल आणि विविध वृक्ष आढळतात. पारिस्थितिकी तज्ज्ञ समुदायांचे वेगवेगळे प्रकार अभ्यासतात, वेगवेगळ्या जाती त्यांच्या समुदायात कोणती भूमिका पार पाडतात आणि त्यांच्यात कसे बदल होतात, ते पाहतात.

विस्तृत भौगोलिक क्षेत्रात पसरलेल्या वनस्पती व प्राणी यांच्या समुदायाला ‘जीवसंहती’ म्हणतात. भिन्नभिन्न जीवसंहतीच्या सीमा हवामानानुसार निश्चित केल्या जातात. वाळवंट, वने, तृणभूमी, टंड्रा व जलीय जीवसंहती यांच्या ‍कित्येक प्रकारांचा समावेश जीवसंहतीत होतो.

एखाद्या जैविक समुदायात पर्यावरणाशी जुळवून घेताना प्रत्येक जाती आपली जागा म्हणजेच ‘सुस्थान’ (नीश) निश्चित करते. कोणतीही जाती पर्यावरणाशी ज्या प्रकारे आंतरक्रिया करू शकते असे सर्व पर्याय सुस्थानात उपलब्ध असतात. उदा., विशिष्ट जाती, ऊर्जा कशी मिळविते किंवा काय खाते; ती कोणाचे भक्ष्य असते; तिला उष्णता, प्रकाश किंवा आर्द्रता किती लागते; कोणत्या परिस्थितीत तिचे प्रजनन घडून येते इ. घटक यात समाविष्ट असतात. अनेक जाती त्यांच्या समुदायात विशिष्ट सुस्थान प्राप्त करतात, असे पारिस्थितिकी तज्ज्ञांना दिसून आले आहे. काही तज्ज्ञांच्या मते, हे स्पर्धेमुळे घडते. जर दोन जाती एकच सुस्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असतील, तर त्यांपैकी एका जातीला मर्यादित स्रोतांमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागते. अन्य तज्ज्ञांच्या मते, जी जाती सक्षमपणे तिची भूमिका पार पाडत असेल, ती आपले सुस्थान मिळविते.

परमोच्च समुदाय : प्रकाशाच्या तीव्रतेत होणारे बदल, वाऱ्यापासून संरक्षण, मृदेतील बदल इ. घटक एखाद्या क्षेत्रातील सजीवांच्या प्रकारात बदल करू शकतात आणि त्यामुळे समुदायातील समष्टीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी, जातींची संख्या व त्यांचे प्रकार बदलल्याने त्या क्षेत्राच्या भौतिक व रासायनिक वैशिष्ट्यांमध्ये बदल घडून येतात. मात्र असे क्षेत्र कालांतराने स्थिर होऊ शकते. या अवस्थेला ‘परमोच्च समुदाय’ (क्लायमॅक्स कम्युनिटी) म्हणतात. ही अवस्था काही शेकडो ते हजारो वर्षे टिकू शकते.

पारिस्थितिकी अनुक्रमण : समुदायामध्ये काळानुसार होणाऱ्या बदलांना ‘पारिस्थितिकी अनुक्रमण’ म्हणतात. ही एक सावकाश घडून येणारी प्रक्रिया आहे. एखाद्या क्षेत्रातील सजीवांच्या संख्येत होणाऱ्या बदलावरून पारिस्थितिकी अनुक्रमणाचा अभ्यास करता येतो.

पारिस्थितिकी अनुक्रमणाचे प्राथमिक व द्वितीयक असे प्रकार करतात. प्राथमिक अनुक्रमणात जेथे जीवन अस्तित्वात नसते अशा क्षेत्रात सजीव राहू लागतात. उदा., ज्वालामुखीच्या स्फोटानंतर नव्याने तयार झालेले बेट. द्वितीयक अनुक्रमणात अस्तित्वात असलेला समुदाय अडचणीत सापडतो. उदा., वणव्यामुळे वनसमुदाय नाश झाल्यानंतर असे अनुक्रमण घडते. अशा ठिकाणी, प्रथम रानफुले व गवते वाढतात. त्यापाठोपाठ झुडपे वाढून कुरणे तयार होतात. शेवटी वृक्ष वाढतात आणि त्यांपासून पुन्हा वन तयार होते. अशा प्रकारे परमोच्च समुदाय देखील निसर्गाच्या प्रेरणेमुळे बदलू शकतात. पारिस्थितिकी तज्ज्ञांच्या मते, वणवे आणि अन्य मोठ्या नैसर्गिक घडामोडी काही वेळा अपेक्षित व गरजेच्या असतात.

(३) परिसंस्था : परिसंस्था ही निसर्गातील संघटनाची जटिल पातळी आहे. समुदाय आणि पर्यावरणातील अजैविक घटक (उदा., वातावरण, मृदा, पाणी, हवा, पोषक घटक आणि ऊर्जा इ.) यांपासून परिसंस्था बनते. परिसंस्थेतील अनेक अजैविक व जैविक घटकांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न पारिस्थितिकी तज्ज्ञ करतात. या अभ्यासातून परिसंस्थेत ऊर्जेचा प्रवाह कसा असतो आणि पदार्थांचे चक्रीभवन कसे होते, त्यानुसार पारिस्थितिकी तज्ज्ञ परिसंस्थेवर प्रभाव करणाऱ्या घटकांचे सहा मुख्य गट करतात : (१) सूर्य, (२) अजैविक पदार्थ, (३) प्राथमिक उत्पादक, (४) प्राथमिक भक्षक (ग्राहक), (५) द्वितीय भक्षक आणि (६) अपघटक.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1019 +22