राष्ट्रवादी इतिहास म्हणजे काय?www.marathihelp.com

राष्ट्रवादी इतिहास म्हणजे काय?

एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास "राष्ट्रवादी इतिहासलेखन" असे म्हणतात.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहासलेखनाला विरोध केला. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले.राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 5702 +22